ह्युंदाय, टोयोटाच्या मोटारी नववर्षात महागणार

नववर्षाचा मुहूर्तावर मोटार खरेदीची योजना आखत असाल तर नक्कीच ती काहीशी महाग ठरणार आहे.

ह्युंदाय मोटर इंडिया आणि टोयोटा या आघाडीच्या मोटार उत्पादकांनी १ जानेवारीपासून आपल्या मोटारींची भाववाढ करण्याची घोषणा केली आहे. ह्युंदायने ३० हजार रुपयांपर्यंत, तर टोयोटाने ३ टक्क्यांपर्यंत भाववाढ जाहीर केली आहे.

या कंपन्यांच्या मार्गाने इतरही कंपन्या जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही मोटार उत्पादक कंपन्यांनी या भाववाढीसाठी चलन विनिमयातील चढउतार आणि त्यामुळे कच्च्या मालावरील वाढता खर्च यांना जबाबदार धरले आहे.

देशात उपलब्ध सर्व वाहनांवरही भाववाढ लागू होणार आहे. ह्युंदायकडून देशात ९ मोटारींची विक्री केली जात आहे. ज्यांची किंमत ३.१० लाख ते ३०.४१ लाख रुपयांपर्यंत आहे.

याआधी जर्मनीच्या मर्सिडिझ बेन्झ आणि बीएमडब्ल्यू यांनीही भाववाढ जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *