पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्क परिषदेस उपस्थित राहण्यासाठी पुढील वर्षी पाकिस्तानला जाण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर २०१६ मध्ये ही परिषद होण्याची शक्यता आहे. १२ वर्षानंतर प्रथमच भारताचा पंतप्रधान पाकिस्तान दौ-यावर जाईल.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी याची घोषणा केली. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तानला गेले होते. जानेवारी २००४ मध्ये त्यांचा हा दौरा झाला होता.