कुर्ल्यातील गोदामात भीषण आग

कुर्ल्यातील गोदामात भीषण आग

कांदिवलीतील दामू नगर झोपडपट्टीतील भीषण आगीच्या आठवणी अद्याप ताज्या असतानाच कुर्ला येथील काही गोदामांत भीषण आग लागली आहे. बुधवारी रात्री कुर्ल्यातील रौकेय्या इस्टेट येथे लागल्या अग्नितांडवामुळे तेथील रहिवाशांची झोपच उडाली आहे.
आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली खरी मात्र तोपर्यंत लाखो रुपयांचे सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालेले नाही.
ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *