अमेरिकेतील शिक्षणविषयक पुरस्कारासाठी ४ भारतीय शिक्षकांना नामांकन

शिक्षण क्षेत्रात अपूर्व योगदानासाठी नोबेलच्या तोडीचा समजला जाणा-या पारितोषिकासाठी चार भारतीय शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.  दहा लाख अमेरिकन डॉलरचा हा पुरस्कार आहे. या चौघांतून अंतिम विजेत्याची निवड केली जाईल.

केरळातील व्यावसायिक सनी वर्की यांनी हा पुरस्कार ठेवला असून यापैकी दोन शिक्षक मुंबईचे आहेत तर दोघे दिल्ली व बंगळुरूचे आहेत. १४८ देशांतील ८ हजार अर्जातून या चार शिक्षकांची निवड झाली आहे.

मुंबईचे रॉबिन चौरसिया, धवल भाटिया, बंगळुरूतील संथी करमचेटी आणि दिल्लीतील रश्मी कथुरिया हे ते चार शिक्षक आहेत.

चौरसिया यांनी मुंबईतील रेड लाईट भागातील मुलींना सक्षम करण्यासाठी क्रांती ही एनजीओ स्थापन केली आहे. ऑस्कर विजेता अभिनेता दुबईतील एका कार्यक्रमात विजेत्या शिक्षकाचे नाव जाहीर करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *