काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. पंतप्रधानांनी आज सकाळी ट्विटरवरून शुभेच्छा देताना म्हटले, की काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य लाभो ही प्रार्थना. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही सोनिया गांधींनी दूरध्वनी करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. काँग्रेस नेत्यांकडूनही त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.