काळा पैसा बाहेर जाणाऱ्या देशात भारत चौथा

बेकायदेशीर मार्गाने पैसा बाहेर जाणाऱ्या देशांच्या क्रमवारीत जगात भारताचा क्रमांक चौथा आहे. भारतातून 2004 ते 2013 दरम्यान दरवर्षी 51 अब्ज डॉलर रकमेचा ओघ बाहेर पडला आहे, अशी माहिती एका थिंक टँकच्या अहवालानुसार समोर आली आहे.
 
अमेरिकेतील ग्लोबल फायनान्शिअल इंटिग्रिटी या थिंक टँकच्या अहवालानुसार, बेकायदेशीररित्या पैसा बाहेर जाणाऱ्या देशांच्या यादीत चीनचा पहिला क्रमांक लागतो. चीनमधून 2004 पासून 2013 पर्यंत दर वर्षाला 139 अब्ज डॉलरची रक्कम बाहेर गेली आहे. त्यापाठोपाठ रशिया (104 अब्ज डॉलर) व मेक्सिको (52.8 अब्ज डॉलर) या देशांमधून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा परदेशात पाठवण्यात आला आहे. 
 
कर बुडवेगिरी, गुन्हे, भ्रष्टाचार व इतर बेकायदेशीर हालचालींकरिता हा काळा पैसा परदेशात पाठवण्यात आला आहे. मागील दहा वर्षांमध्ये विकसनशील देशांमधून 1.1 लाख कोटी डॉलर बाहेर पडले आहेत. आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणालीत असलेल्या अपारदर्शकतेमुळे बेकायदेशीर व्यवहारांना चालना मिळते. त्यामुळे जगभरातील सर्व देशांनी एकत्रित येऊन ही अपारदर्शकता मिटवण्याचा प्रयत्न करावा, असे जीएफआयच्या अहवालात सुचवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *