महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता

पुण्यासह मध्य महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 11 डिसेंबरला गारपीट होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

महाराष्ट्रासह तेलंगणामध्येही पावसाची शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेने सांगितलं आहे.  महाराष्ट्रात ज्या ठिकाणी गारपीट होणार त्या ठिकाणची माहिती हवामान खात्याच्या वेबसाईटवर 4 तास आधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

तामिळनाडुलगतच्या किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तामिळनाडुमध्ये देखील पुढील काही दिवस पावसाचा जोर राहण्याची चिन्ह असल्याचं एन चट्टोपाध्याय यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *