मुख्यमंत्री निधीसाठी पोलिसांच्या पगारातून एक पैसाही कापणार नाही : मुख्यमंत्री

पोलिसांच्या पगारातून एक नवा पैसाही कापला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये दिली.

मुख्यमंत्री निधीसाठी पोलिसांचा दोन दिवसांचा पगार कापला जाणार अशी बातमी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये छापण्यात आली आहे.

मात्र ‘सामना’नं नीट माहिती घेतली असती तर चुकीची बातमी छापली नसती, असा टोला हाणत पोलिसांचा पगार कापणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. काही स्वयंसेवी संस्थांनी मुख्यमंत्री निधीत पैसा जमा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *