मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेश नको – ट्रम्प

मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेश नको – ट्रम्प

जगभरातील मुस्लिम नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घातली पाहिजे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाच्या शर्यतीतील आघाडीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे.
 
कॅलिफोर्नियातील सॅन बर्नाडिनो येथे सईद रिझवान फारूख (वय 28) आणि त्याची पत्नी तशफीन मलिक (वय 27) यांनी गोळीबार केला होता. त्यानंतर पोलिसांशी झालेल्या चकमकीत हे दोघेही ठार झाले होते. या घटनेत 14 जणांचा बळी गेला होता, तर 21 जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी मुस्लिम नागरिकांबद्दल हे मत व्यक्त केले आहे.
 
ट्रम्प म्हणाले, की अमेरिकन नागरिकांबद्दल मुस्लिम नागरिकांचा वाढत चाललेला द्वेष देशाला धोक्यात टाकत असल्याचे अनेक सर्वेमधून स्पष्ट झालेले आहे. मुस्लिम नागरिकांमध्ये एवढा द्वेष कोठून आला आणि कसा आला, हे आपण बघितले पाहिजे. 
 
ट्रम्प यांच्या वक्तव्याचा व्हाईट हाऊसकडून निषेध करण्यात आला आहे. ट्रम्प यांचे वक्तव्य अमेरिका विरोधी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या हिताविरोधात असल्याचे म्हणण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *