मी इंदिरा गांधी यांची सून आहे, कोणाला घाबरत नाही, असे आक्रमक वक्तव्य काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलल्यानंतर केले.
दिल्ली उच्च न्यायालयाने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात आज (मंगळवार) पुढील सुनावणी 19 डिसेंबरला होणार असल्याचे सांगितले. सोनिया आणि राहुल गांधींना 19 डिसेंबरला सुनावणीवेळी न्यायालयात उपस्थित रहावे लागणार आहे. नॅशनल हेरॉल्डची 5 हजार कोटींची संपत्ती हडप केल्याचा आरोप भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला आहे.
याविषयी सोनिया गांधींना आपण काळजीत आहात का? असे विचारल्यानंतर त्यांनी माझे निराश होण्याचे कारणच नाही. मी इंदिरा गांधींची सून आहे. कोणाला घाबरत नाही. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.