जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आज (सोमवार) सकाळी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यातील बीजबेहारा गावातील सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांना जवानांकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अद्याप चकमक सुरु आहे.
या हल्ल्यानंतर घटनास्थळी लष्करी जवानांना पाचारण करण्यात आले आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.