शोध’ या कादंबरीचे लेखक मुरलीधर खैरनार यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांनी नाशिकमध्ये अखेरचा श्वास घेतला. साहित्यिक, नाट्यकर्मी आणि इतिहासाचे अभ्यासक म्हणून मुरलीधर खैरनार यांची ओळख होती.
मुरलीधर खैरनार यांची याच वर्षी जुलै महिन्यात प्रकाशित झालेल्या ‘शोध’ कादंबरीने वाचकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली. या वाचकांच्या पसंतीस पडलेल्या ‘शोध’ कादंबरीची अवघ्या एका महिन्यात दुसरी आवृत्ती छापावी लागली.
खैरनार यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शेतकरी संघटना, दीपक मंडळ इत्यादी संस्था आणि संघटनांमध्ये कार्यकर्ता म्हणून काम केले होते. नाशिक सार्वजनिक वाचनालयातर्फे कादंबरी लिखाणाचा पुरस्कार देऊनही नुकताच खैरनार यांना सत्कार करण्यात आला होता.