लंडनमध्ये चाकू हल्ला, तीन जखमी

लंडनमध्ये चाकू हल्ला, तीन जखमी

ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये मेट्रो स्थानकावर हल्लेखोरांनी तीन प्रवाशांवर चाकू हल्ला केल्याचा प्रकार घडला.

हल्लेखोर आपण सिरियासाठी हे काम करत असल्याचा दावा करत आहे, त्यामुळे हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहे.

लंडनच्या लियटॉनस्टोन मेट्रो स्थानकावर शनिवारी रात्री हा हल्ला झाला असून यामध्ये एका प्रवाशाच्या गळ्यावर वार झाल्याने गंभीर जखमी आहे तर दोन जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.

इस्लामिक स्टेट (इसिस) दहशतवादी संघटनेच्या सीरियातील तळांवर हल्ला करण्यासंदर्भातील प्रस्तावाला ब्रिटीश संसदेने दोन दिवसांपुर्वीच संमती दिली आहे. त्यानंतर हा हल्ला झाला. त्यामुळे ब्रिटीश तपास यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याच्या दिशेने तपास सुरू केला आहे.

हल्लेखोर आपण सिरियासाठी हे काम करत असल्याचे सांगत होता. हल्लेखोराला अटक करण्यात आली असून त्याची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *