बारमधून हप्ता घेणाऱ्या 49 पोलिसांच्या बदल्या, ठाणे पोलिस आयुक्तांची कारवाई

बारमधून हप्ता घेणाऱ्या 49 पोलिसांच्या बदल्या, ठाणे पोलिस आयुक्तांची कारवाई

बारमधून हप्ता घेणं ठाण्यातील पोलिसांना चांगलंच भोवलं आहे. अतिरिक्त आयुक्तांनी हप्तेबाज पोलिसांची दखल घेत त्यांच्यावर बदलीची कारवाई केली आहे. डायघर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह 49 पोलिसांवर बदलीची कारवाई करण्यात आली आहे.

विशेष शाखेचे उपपोलीस आयुक्त अधिकारी सचिन पाटील यांनी 15 एप्रिलला उत्सव बारमध्ये छापा टाकला होता. यावेळी एक डायरी मिळाली होती. या डायरीत तब्बल 49 पोलीस हफ्ता घेत असल्याचं स्पष्ट लिहीलं होतं.

याची दखल घेत अतिरिक्त आयुक्त लक्ष्मी नारायण यांनी डायघर पोलीस स्टेशनमधली वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 49 पोलिसांची ठाण्याच्या हेडक्वॉटरला बदली केली आहे. यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. एस. पवार आणि उदय जाधव यांचाही समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *