कॅफे मद्रासची खास ऑफर, 75 वर्षांपूर्वीच्या दरात पदार्थ

कॅफे मद्रासची खास ऑफर, 75 वर्षांपूर्वीच्या दरात पदार्थ

मुंबईतील माटुंग्यामधल्या सुप्रसिद्ध कॅफे मद्रासने मंगळवारी 75 वर्ष पूर्ण केली. आपली 75 वी अॅनिव्हर्सरी संस्मरणीय करण्यासाठी कॅफेच्या मालकांनी अनोखी शक्कल लढवली. 75 वर्षांपूर्वी ज्या दरात हॉटेलमधील पदार्थ उपलब्ध होते, त्याच दराने त्यांनी मंगळवारी विक्री केली.

कॅफे मद्रासमध्ये आलेल्या अनेक ग्राहकांनी त्यामुळे नॉस्टॅल्जिया अनुभवला. 1940 मध्ये कॅफे सुरु झाले त्यावेळी असलेल्या दरात इडली, उपमा, कॉफी सर्व्ह करण्यात आली. इडली 40 पैसे, उपमा 10 पैसे तर फिल्टर कॉफी 15 पैशांना होती, मात्र जे पदार्थ त्यावेळी कॅफेच्या मेन्यूकार्डवर नव्हते, त्यांची विक्री आजच्या दरानुसारच करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *