डॉ. कलाम यांच्या पणतूंची भाजपाला सोडचिठ्ठी

डॉ. कलाम यांच्या पणतूंची भाजपाला सोडचिठ्ठी

भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या दिल्लीतील निवासस्थानाचे रुपांतर स्मृतीस्थळात करण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत एपीजे अब्दुल कलाम यांचे पणतू एपीजे सय्यद इजा इब्राहिम यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे.

डॉ. कलाम राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर दिल्लीतील ल्युटन्स झोनमधील १०, राजाजी मार्ग येथे राहात होते. कलाम यांच्या या निवासस्थानाचे रुपांतर स्मृतीस्थळात करण्याची मागणी अनेकांकडून करण्यात आली होती. यासाठी कलाम यांचे पणतू एपीजे सय्यद इजा इब्राहिम यांनीही पुढाकार घेतला होता.

मात्र कलाम यांच्या निधनानंतर नगरविकास मंत्रालयाने त्यांचे निवासस्थान केंद्रीयमंत्री महेश शर्मा यांना देण्याचा निर्णय घेतला. केंद्राने घेतलेल्या या निर्णयावर इब्राहिम नाराज झाल्याने सोमवारी अखेर त्यांनी नाराजी व्यक्त करत पक्षातील पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

दिल्लीतील कलाम यांच्या निवासस्थानाचे स्मृतीस्थल व्हावे, ही केवळ माझीच इच्छा नसून अनेकांची आहे. याबाबत अनेकदा विनंती करूनही नगरविकास मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे इब्राहिम यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *