खंबाटकी घाटात दोन बस अपघातात एक ठार, ३८ जखमी

खंबाटकी बोगद्याजवळील एस. वळणावर रविवारी पहाटे पाचच्या सुमारास दोन खासगी लक्झरी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला झाला. जखमींना ग्रामीण रुग्णालय खंडाळा तसेच शिरवळ येथील जोगळेकर रुग्णालयात दाखल केले आहे.

या अपघातात ठाण्यातील दिपक निकम यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन्ही बसमधील मिळून ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही बसेस क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरुन बाजूला हलवण्यात आल्या असून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे.

रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईला जाणारी पावलो लक्झरी ट्रॅव्हल्स एस वळणावर समोरुन उलट्या दिशेने येणा-या साजिरा ट्रॅव्हल्सला जोराची धडक दिली. धडकेनंतर ही गाडी वीस फूट लांब जाऊन खोल खड्ड्यात पडली. मुंबईहून चांदोलीला जाणारी साजिरा लक्झरी चालक विजय चोरगे हा घाटरस्ता वाचविण्यासाठी विरुध्द बाजूने बोगद्यामार्गे जात असल्याने अपघात झाल्याने या चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र हा चालक फरार झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शेळके करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *