तेजाब‘, ‘राम-लखन‘, ‘बेटा‘ अशा चित्रपटांमधून झळकलेली लोकप्रिय जोडी अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित बऱ्याच वर्षांनी एकत्र दिसले. “कलर्स‘ वाहिनीच्या गोल्डन पेटल ऍवॉर्ड सोहळ्यात अनिल आणि माधुरी यांनी एकत्र “परफॉर्मन्स‘ केला.
अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी “एक लडकी को देखा तो ऐसा लगा‘ आणि “राम-लखन‘मधील काही गाण्यांवर पदन्यास केला. ही जोडी इतक्या वर्षांनंतर एकत्र पाहायला मिळाल्याने प्रेक्षकांच्या चेहऱ्यांवरही आनंद झळकत होता. याबाबत अनिल कपूर म्हणाला, “”माझ्या आवडत्या सहकलाकारासोबत इतक्या वर्षांनी थिरकताना खूपच आनंद झाला. माधुरी केवळ उत्तम कलाकार नाही, तर खूप चांगली व्यक्ती आहे. ती माझी आवडती कलाकार आहे.‘‘ माधुरी आणि अनिल 2001 मध्ये “लज्जा‘ या चित्रपटामध्ये दिसले होते. त्यानंतर 11 वर्षांनी ते पुन्हा एकत्र आले.