मोदी-आबे भेटीवेळी फडकला भारताचा उलटा झेंडा

मोदी-आबे भेटीवेळी फडकला भारताचा उलटा झेंडा

आसिआन परिषदेसाठी मलेशियात दाखल झालेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जपानचे अध्यक्ष शिंझो आबे यांची भेट झाली त्यावेळी भारताचा झेंडा उलटा फडकविल्याचे समोर आले आहे.
 
आज (शनिवार) सकाळी पंतप्रधान मोदींनी चीनचे पंतप्रधान ली केक्वियांग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केल्यानंतर जपानचे अध्यक्ष शिंझो आबे यांची भेट घेतली. या भेटीवेळी या दोन्ही नेत्यांमागे देशांचे झेंडे लावण्यात आले होते. यावेळी भारताच्या झेंड्यात वर असलेला भगवा रंग खाली लावण्यात आला होता आणि हिरवा रंग वर दिसत होता. यावरून सोशल मिडीयात चर्चांना उधाण आले आहे. भारतीय झेंड्याचा अपमान असल्याची टीका करण्यात येत आहे. 
 
पंतप्रधान मोदी आजपासून मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यांमध्ये दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेच्या (आसिआन) तेराव्या शिखर परिषदेला आणि दहाव्या पूर्व आशियाई शिखर परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *