मालीच्या बामकोमध्ये हल्ला,१७० जणांना ठेवले ओलीस

मालीच्या बामकोमध्ये हल्ला,१७० जणांना ठेवले ओलीस

मालीच्या बामको येथील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये शस्त्रधारी अतिरेक्यांनी हल्ला केला असून तब्बल १७० लोकांना ओलीस ठेवल्याचे वृत्त आहे.

गाडीतून आलेल्या १० अतिरेक्यांच्या समूहाने हा हल्ला केल्याचे वृत्त विदेशी एजंसी तसेच बीबीसीने दिले आहे. अद्याप कोणत्याही अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.

हे सर्व अतिरेकी इस्लामी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हॉटेलच्या आतील परिसरातून गोळीबार तसेच स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये शस्त्रधारी अतिरेक्यांनी हल्ला केल्याचे ट्विटही बामकोमधील अमेरिकी दूतावासने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *