आग्नेय जपानमधील बोनिन बेट समुहाला शुक्रवारी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल इतकी होती, अशी माहिती अमेरिकेच्या भूकंपमापन संस्थेने दिली.
या भूकंपामुळे जीवितहानी झाली अथवा नाही, याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. जपानची राजधानी असलेल्या टोकियोपासून सुमारे हजार किमी अंतरावर दक्षिण दिशेला हा भूकंप झाला.
भूगर्भामध्ये सुमारे १० किमी खोलीवर हा भूकंप झाला. जपानचा समावेश प्रशांत महासागरातील ‘रिंग ऑफ फायर’ या क्षेत्रात समावेश होतो. या क्षेत्रात अनेक ज्वालामुखी असून हे जगातील भूकंपप्रवण क्षेत्र आहे.