१११ वाहनांविरुद्ध गुन्हा १३ अ‍ॅटोरिक्षांवर जप्तीची कारवाई

१११ वाहनांविरुद्ध गुन्हा १३ अ‍ॅटोरिक्षांवर जप्तीची कारवाई

अ‍ॅटोरिक्षाच्या विशेष तपासणीत दोषी आढळलेल्या १११ वाहनांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदविले असून त्यातील १३ अ‍ॅटोरिक्षांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेल्या अ‍ॅटोरिक्षांपैकी चार वाहनांची नोंदणी रद्द तर आठ वाहनचालकांचे लायसन्स रद्द करण्यात आले असून या मोहिमेतून ४ लाख २६ हजार रूपयांचा महसूल गोळा झाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली.

राज्यातील सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना परिवहन मंत्र्यांनी राज्यांतील ऑटोरिक्षा तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने सिंधुदुर्गात ३० ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत अ‍ॅटोरिक्षांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली होती.

ही तपासणी करताना प्रामुख्याने विनापरवाना चालविण्याऱ्या रिक्षा, परवाना व्यपगत, नोंदणी रद्द झालेल्या रिक्षा आढळून आल्यास जप्तीची कारवाई करण्यात आली. भरारी पथकामार्फत राज्यात आलेल्या अ‍ॅटोरिक्षाच्या विशेष तपासणी मोहिमेत जिल्हाभरातील ४७३ ऑटोरिक्षांची तपासणी करण्यात आली.

यातील १११ ऑटोरिक्षांमध्ये वरीलप्रमाणे त्रुटी आढळल्याने या वाहनांविरुद्ध मोटार वाहन कायदयाच्या विविध कलमांमध्ये गुन्हे नोंद करण्यात आले तर यातील १३ वाहने जप्त करण्यात आली. ८ वाहन चालकांचे लायसन्स रद्द तर ४ वाहनांची नोंदणी रद्द करण्यात आली.

या मोहिमेला दंडस्वरूपात ४ लाख २६ हजार ६०५ रूपयांचा महसूल गोळा करण्यात आला. महसूल ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक पी. डी. सावंत, पी. आर. रजपूत, एस. डी. पाटील, सहाय्यक मोटार निरीक्षक वाय. पी. ओतारी यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *