मुंबईत काल एकाच दिवशी आगीच्या तीन घटना घडल्या. काल मध्यरात्री अडीचच्या सुमारास दादर वेस्ट मधल्या अहमद उमर नावाच्या रहिवाशी इमारतीला अचानक आग लागली. या इमारतीमध्ये खाली दुकानं तर वर फ्लॅट्स आहेत.
आगीची माहिती मिळताच 15 अगिशमन दलाच्या गाड्या आणि 5 अॅम्ब्युलन्स घटनास्थळी रवाना झाल्या होत्या. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करुन तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवून आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला.
तर दुसरीकडे काल रात्री कांदिवलीमध्ये लागलेल्या झोपडपट्टीमधील आगही विझविण्यात आली आहे. काल रात्री साडे सातच्या सुमारास एमजी रोडवरील जलतरण तलावाच्या मागील झोपडपट्टीला ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
झोपडपट्टीतील दुकानांमध्ये असलेल्या सिलेंडरमुळे आग भडकत होती. अखेर तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. दरम्यान, आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
तर लोअर परेलमध्येही आग लागली होती. मध्यरात्री जवळपास अडीच वाजताच्या सुमारास ही आगीची घटना घडली. लोअर परेलमधल्य़ा सन मिल कंम्पाऊंडला ही लागली होती. ही आग विझवण्यातही अग्निशमन दलाला यश आलं आहे. यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही.