आजकाल हॉटेलिंग ही काही नवीन गोष्ट नाही. दर आठवडयाला जेवणाच्या व्यापापासून घरच्या महिलांना सुट्टी मिळावी म्हणून वीकेंटला भेट दिली जाते. पण ब-याचदा कित्येक ठिकाणी गोंधळ उडालेला दिसून येतो. तसंच कॉर्पोरेट मीटिंगला गेल्यावरही काही मॅनर्स किंवा एटीकेट्स आपल्याला पाळावे लागतात. त्यासाठी हे काही एटिकेट्स आम्ही तुमच्यासाठी देत आहोत.
» चमचे हाताळताना एका हातात चमचा असेल तर तुमचा दुसरा हात पायावर ठेवावा. तुम्ही कोणताही चमचा धरला नसेल तेव्हा दोन्ह हात पायांवर ठेवावेत, घाबरू नका किंवा चुळबुळदेखील करू नका. आणि तुमचे हात तुमच्या केसांपासून लांब ठेवावेत.
» सूप पिताना सुपातील चमचा तुमच्यापासून लांब आणि बाऊलमध्ये ठेवावा.
» अनौपचारीक जेवणाच्या वेळी शांतता बाळगावी. जेवण चमच्याने उचलतानादेखील चमच्याचा आवाज होणार नाही याची काळजी घ्यावी. समजा चमच्याने जेवण घेताना समोरच्याच्या अंगावर उडालं तर त्याची माफी मागावी. समोरच्याच्या अंगावर उडालेलं स्वच्छ करण्यासाठी वेटरला कोणाला तरी स्वच्छ करण्यासाठी सांगावं.
» ताटात पदार्थ घेताना तो सजवलेला असेल तर त्याच्या सजवलेल्या प्रकारानुसारच तो पदार्थ उचलण्याचा प्रयत्न करावा. स्वतंत्र तुकडयाचा पदार्थ असतील तर ते अखंड उचलावेत.
» चमचा हातात घेऊन कोणत्याही प्रकारचे अंगविक्षेप करू नयेत.
» जेव्हा चकत्या किंवा काकडी, टोमॅटोसारखे स्लाईस केलेले पदार्थ असतील तर शक्यतो एकच उचलावा. आपण उचलणारे शेवटचे आहोत असं समजून किंवा सगळ्यांना पुरेल याचा विचार करूनच पदार्थ घ्यावेत. सगळ्यांना उरेल याचा विचार करून पदार्थ ताटात सोडावेत.
» अनौपचारीक जेवणाच्या वेळी आपल्या आजूबाजूच्या पाहुण्यांपर्यंत किंवा त्यांच्या जवळ डिश पोहोचवणं गरजेचं असतं. गोंधळ उडू नये म्हणून उजव्या बाजूने पास करायला सुरुवात करावी.
» प्रत्येक वेळी सव्र्हिस जेवणाच्या वेळी मिळते. प्रत्येक वेळी बोलूनच नकार दिला पाहिजे असं नाही, मात्र तुम्हाला एखाद् वेळी सव्र्हिस नको असेल तर त्यांना शांतपणे ‘नो, थँक्यू’ असं सांगावं. आपल्या मागितल्यावर आपल्याला हवी असलेली डिश आपल्या जवळ आल्यास लगेच थँक्यु म्हणजावं.
» आवश्यक असेल तेव्हा जेवणाची स्तुती नेहमीच करावी.
» समजा एखाद्या पाहुण्यांना यायला उशीर होणार असेल तर त्यांच्यासाठी सगळ्यांना थांबवण्यापेक्षा बाकीच्यांना खाण्याची विनंती करून त्यांना सुरुवात करायला सांगावी आणि आपण मात्र तय पाहुण्यांसाठी थांबावं.
» कॉकटेल ग्लास जेवणाच्या टेबलाजवळ कधीही आणू नयेत. कारण जेवणाच्या टेबलाजवळ पाण्याचा ग्लास आधीच भरून ठेवलेला असतो. म्हणूनच कॉकटेलचे ग्लास त्या रूममध्येच सोडून यावेत.
» पाहुणे जेवणाच्या ठिकाणी त्यांच्या सोयीनुसार येतात. त्यामुळे त्यांनी प्रवेश करण्यापूर्वी तिथे जेवणाची व्यवस्थित सोय आहे की नाही हे तपासावं. म्हणूनच आधी लोकांनी प्रवेश करण्यापूर्वी तिथली व्यवस्था बघून यावी. जेवणाची व्यवस्था नीट नसेल तर प्लेस कार्ड्स द्यावीत. होस्टने सर्वात प्रथम हजर राहावं.
» प्लेस कार्डमुळे बसणा-या माणसांची जागा कळते. जेव्हा एकदम दहा-बारा जण असतात तेव्हा प्रत्येकाची जागा समजणं त्यांना अतिशय सोपं जातं. अगदी ग्रूप असेल तरीही त्यांनाही आपली जागा निवडणं सहज सोपं होतं.
» शक्यतो होस्ट असलेल्यांच्या उजव्या बाजूला जाऊन बसावं.
» तुम्ही तुमच्याजवळ तुमची पर्स बाळगली असेल तर ती टेबलावर ठेवू नका. कारण टेबलावरील इतर गोष्टींना त्यामुळे त्रास होण्याची श्क्यता असते. घरी गेल्यावर होस्टने सांगितलेल्या ठिकाणी आपण ती ठेवतो, उदाहरणार्थ, बेडरूम किंवा टीपॉय. पण रेस्टॉरंट किंवा पब्लिक प्लेसच्या ठिकाणी हे शक्य नसतं. असं असलं तरी ती टेबलावर न ठेवता मांडीवर ठेवावी. किंवा पटकन हाताशी मिळेल अशा जागी ठेवावी.
» जेवणाच्या टेबलाभोवती बसल्यावर कधीही लिपस्टिक लावू नये. जेवणाच्या ठिकाणी येण्यापूर्वीच ती काहीशी कमी करून यावी. म्हणजे ग्लासवर किंवा नॅपकिनवर तिचे डाग दिसणार नाहीत. कारण असे डाग चांगले दिसत नाहीत..
» मेजवानीच्या ठिकाणी किंवा पंक्तीत बसले असताना आपल्या बाजूला बसलेल्या माणसाला वाढेपर्यंत थांबावं. मगच सुरुवात करावी. तर बुफे असताना तुमचं सगळं जेवण घेऊन झालं की मगच सुरुवात करावी. एकेक पदार्थ घेऊन तो खाणं उचित दिसत नाही.
» सावकाश खावं. म्हणजे समोरच्याला बोलायला वाव मिळतो.
» जेवणाच्या टेबलाजवळ कधीही सिगारेट ओढू नये.
» कित्येकदा आपल्याला आजूबाजूला काही माणसं टोपी किंवा हॅट घालून बसलेली दिसतात. मात्र हे अतिशय चुकीचं दिसतं. म्हणूनच ही हॅट काढून बसावं. फास्ट फूडच्या जेवणात मात्र ही हॅट कोणत्याही प्रकाराने घातली तरीही चालते.
» कधी कधी आपण ऑर्डर करतो मात्र आपल्याला तितकं जेवण जातच असं नाही. थोडक्यात पोट भरतं. अशा वेळी आपण ते उरलेलं जेवण घरी घेऊन जाऊ शकतो, मात्र तुमची ही बिझनेस मीटिंग असेल तर मात्र असं करणं उचित नाही.
» आपल्याला समोरच्याच्या तोंडाला कधी कधी अन्नपदार्थ लागलेले दिसतात. पण त्यांना सांगायचं कसं असा आपल्यासमोर प्रश्न पडलेला असतो. कित्येक वेळी ते सांगणं कठीण होतं. पण आजूबाजूच्याला कळणार नाही आणि केवळ त्याच व्यक्तीला समजेल अशा युक्तीने सांगावा. त्याला केवळ इशारा करावा. न बोलता बोटाने ती जागा दाखवली तरीही चालेल.
» कोणाच्या घरी जेवायला गेला असाल आणि चमच्यावर किंवा टेबलावर काही सांडल्यास त्या होस्टला समजणार नाही अशा रीतीने ते पुसून घ्यावं. मात्र रेस्टॉरंटमध्ये असाल तर वेटरला किंवा अन्य कोणाला ते क्लिन करायला सांगावं.
» रिलॅक्स मूडमध्ये राहा. उगाच टेन्शन घेऊन बसू नका.
» कप, सुपच्या बाऊलमध्ये किंवा ग्लासामध्ये कधीही चमचा ठेवू नये. दोन घासांच्या मध्ये किंवा जेवण झाल्यावर प्लेटच्या बाजूला चमचे काढून ठेवावेत.
» कॉफी किंवा चहा टेबलावर आधीच आलं असेल आणि वेटर ते सव्र्ह करायला कोणीही वेटर नसेल तर त्या टेबलाजवळ असलेल्या व्यक्तीने ते सव्र्ह करावं.
» ताटात उरलेली ग्रेव्ही नेहमी ब्रेडच्या तुकडयाने पुसून घ्यावी. त्यानंतर तो चमच्याने तोंडात घ्यावा.
» ढेकर येणार असेल तर तोंड नॅपकिनने कव्हर करावं. हळूच ढेकर द्यावी मात्र त्यानंतर ‘एक्सक्युज मी’, असं आवर्जून म्हणावं. एकामागून एक ढेकर येणार असतील तर मात्र स्त:च टेबल सोडून निघून जावं.
» जांभईचंदेखील असंच आहे. ती जांभई येण्याअगोदरच तोंडावर रुमाल ठेवावा.
» सूप खूप गरम असेल तर मात्र ते लगेच पिण्याऐवजी काही वेळ ढवळत राहावं.