इंदिराजींच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली

इंदिराजींच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे.
 
दिल्लीतील शक्तीस्थळ येथे जाऊन पुष्पचक्र अर्पण करत राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह प्रमुख काँग्रेस नेत्यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. इंदिराजींच्या जयंतीनिमित्त मी त्यांना श्रद्धांजली वाहतो, असे मोदींनी म्हटले आहे. इंदिराजींच्या जयंतीनिमित्त युवक काँग्रेसकडून ‘माँ तुझे सलाम‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *