सहा तासाची शाळा आठ तास करण्याची शिफारस केल्यानंतर राज्य सरकारने आणखी एक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. नर्सरी ते मोठ्या शिशू वर्गापर्यंत मुलांना मातृभाषेतूनच शिकवण्याची शिफारस सरकारतर्फे करण्यात आली आहे.
तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना केवळ आपल्या मातृभाषेतूनच शिक्षण देण्यात यावं अशी शिफारस सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणात केली आहे. यामुळे सरकारच्या नियंत्रणाखाली नसलेल्या शाळांच्या डोनेशन घेण्यावर चाप बसणार आहे.
शालेय शिक्षणात इतर भाषा आवश्यक असल्या तरी नर्सरी ते केजीपर्यंत इंग्रजी भाषा हद्दपार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मुलांचा विकास हा मातृभाषेतून होणाऱ्या शिक्षणावर अवलंबून असतो असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे या अहवालावर काय प्रतिक्रीया उमटतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
इंग्रजी माध्यमांचे केजी वर्ग बंद करा, सरकारची शिफारस
