मुंबईसह राज्यातील सर्व हॉटेल्समध्ये महाराष्ट्रीयन पदार्थ उपलब्ध होणार असून या निर्णयाची आठवड्याभरात अंमलबजावणी होणार आहे.
मुंबईसह राज्यातील सर्व हॉटेल्समध्ये महाराष्ट्रीयन पदार्थ उपलब्ध करावे व मेनुकार्डमध्ये त्यांचा समावेश करावा ही रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची मागणी हॉटेल मालकांच्या संघटनेने मान्य केली आहे. आठवड्याभरात या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असे सांगण्यात आले.
आठवले यांनी या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
आठवले यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी इंडियन हॉटेल एन्ड रेस्टॉरंटस असोसिएशनच्या पदाधिका-यांनी चर्चा केली व आठवलेंची मागणी मान्य करण्याचा निर्णय जाहीर केला.
आम्हाला मराठमोळे पदार्थ हॉटेल्समध्ये ठेवण्यास आनंद वाटेल. सध्या काही हॉटेल्समध्ये हे पदार्थ उपलब्ध आहेत. मात्र यापुढे सर्व हॉटेल्समध्ये हे पदार्थ मिळतील व मेनुकार्डमध्ये देखील बटाटा वडा, कांदे पोहे यासह सर्व महाराष्ट्रीयन पदार्थांची नावे समाविष्ट करण्यात येतील, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी दिली.