मुंबई वाहतूक पोलिसांच्या मोहिमेत सुपरस्टार हृतिक रोशनही सहभागी झाला आहे. वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनचं हृतिक आणि मुंबई पोलिस आयुक्त जावेद अहमद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. या हेल्पलाईनमुळे नागरिकांना मुंबईच्या रस्त्यांवरील ट्राफिक जाम, पर्यायी मार्ग, बंद रस्ते यांच्याविषयीची माहिती मिळणार आहे.
हेल्पलाईन सुरु करताना हृतिकने मुंबई वाहतूक पोलिसांचे आभार व्यक्त केले. ‘मला या उपक्रमात सहभागी करुन घेतल्याबद्दल जावेद अहमद यांचे आभार. हे उल्लेखनीय पाऊल उचलल्याबद्दल मुंबई पोलिसांना धन्यवाद’ असं ट्वीट हृतिक रोशनने केलं आहे
वाहतूक पोलिसांच्या मोहिमेत हृतिक रोशन सहभागी
