तामिळनाडूत पावसाचा कहर

ईशान्य मान्सूनच्या प्रभावामुळे तामिळनाडूत गेल्या बुधवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला असून, त्यात किमान ७१ जणांचा बळी गेला आहे. राज्याच्या अनेक भागांतील जनजीवन पुरते विस्कळीत झाले असून, जलमय झालेल्या चेन्नईला तर इटलीतील व्हेनिस शहराचे रूप मिळाले आहे. राज्यातील अनेक जिल्हे जलमय झाले असतानाच हा पाऊस पुढील काही तास थांबणार नाही, हा अंदाज लक्षात घेता पूरसदृश स्थितीचा धोका निर्माण झाला आहे.

पुन्हा पावसाचा अंदाज

चेन्नईत गेल्या २४ तासांत २५६ मिलिमीटर पाऊस झाला. येत्या तीन दिवसांत तामिळनाडूत आणखी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पुड्डूचेरी आणि आंध्र प्रदेशातही जोरदार पावसाची शक्यता आहे.

मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख

पूर व भिंत कोसळण्याच्या घटनांमध्ये झालेल्या मृतांच्या संख्येत आणखी १२ जणांच्या मृत्यूने भर पडली आहे. या कहरानंतर मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावत, स्थितीचा आढावा घेतला. शिवाय मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदतही जाहीर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *