शिवाजी महाराज रुग्णालय परिसरात ‘स्वच्छता अभियान’

शिवाजी महाराज रुग्णालय परिसरात ‘स्वच्छता अभियान’

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय परिसरातील अस्वच्छता दूर करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या अधिकारीवर्ग आणि ठाण्यातील लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून ‘स्वच्छता अभियान’ राबवण्यात आले. या मोहिमेंतर्गत परिसरातील कचरा, प्लास्टिक, गवत आणि इतर कचरा साफ करण्यात आला.
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे स्वच्छ भारत अभियान मोहीम राबविण्यात आली. सोमवारी सकाळी या स्वच्छता मोहिमेंतर्गत रुग्णालय आणि परिसर स्वच्छ करण्यात आला. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि महापौर संजय मोरे व आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली.
स्वच्छता मोहिमेसाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, उपायुक्त मुख्यालय संजय निपाणे, उपायुक्त संजय हेरवाडे, अशोक बुरपल्ले, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मैत्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजीव कोर्डे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. हळदेकर, मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या प्राची धारप, वैद्यकीय अधिकारी, अधिव्याख्याता, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थिनींतर्फे पथनाटय़
मिनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनी स्वच्छता अभियानअंतर्गत ‘होणार वस्ती स्वच्छ आमची’ हे पथनाटय़ सादर केले. या अभियानांतर्गत महापालिका यांच्यासह सर्व अधिकारी, प्राध्यापक यांनी हातात झाडू घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे आवार आणि परिसर स्वच्छ केला. या वेळी सर्वानी स्वच्छतेची शपथ घेतली. शेवटी राष्ट्रगीताने या अभियानाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *