आत्तापर्यंत गुन्हेगारांना देशात आणण्याच्या फक्त घोषणाच झाल्या. मात्र भाजप सरकारच्या प्रयत्नांमुळे छोटा राजनला भारतात आणण्यात यश मिळाल्याचं वक्तव्य गृहराज्य मंत्री राम शिंदेनी केलं आहे.
दरम्यान, आता अंडरवर्ल्ड डी गँग आणि दाऊदवर लक्ष्य केंद्रित करुन त्या संदर्भात स्पेशल ड्राईव घेतला आहे. अशी माहितीदेखील गृहराज्य मंत्री राम शिंदेंनी दिली आहे. छोटा राजनच्या आरोपांनुसार मुंबई पोलिसांचे दाऊदशी संबंध आहे की नाही, याची चौकशी सुरु आहे. त्यामुळे या चौकशीत कोणी दोषी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल. असा गृहराज्यमंत्र्यांनी इशारा यावेळी दिला.
राजनची कोठडीत चौकशी सुरु असून त्याच्याकडून बऱ्याच महत्त्वाची मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे नुकतीच राजनला संपविण्याचा धमकी छोटा शकीलने दिली आहे.