लोअर परेलच्या पॅलेडिअम हॉटेलजवळ अपघात, १ जखमी

लोअर परेलच्या पॅलेडिअम हॉटेलजवळ अपघात, १ जखमी

लोअर परेल येथील पॅलेडिअम हॉटेलबाहेर शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात एक परदेशी नागरीक जखमी झाला. भरधाव वेगात आलेल्या कार चालकाने हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या तीन टॅक्सींना धडक दिली.

यावेळी तिथे असणारा परदेशी नागरीक जखमी झाला. शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांनी कारचालक अनुप पांडे याला ताब्यात घेतल आहे. अपघाताच्यावेळी अनुप पांडे मद्याच्या अंमलाखाली होता का ? याचाही पोलिस तपास करत आहेत.

या अपघातात धडक बसलेल्या तीनही टॅक्सींच मोठ नुकसान झाल आहे. जखमी परदेशी नागरीकाला उपचारांसाठी दक्षिण मुंबईतील एका मोठया खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कारचालक अनुप पांडे हा मुंबईतील एका बडया हॉटेलमध्ये मोठया पदावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *