येथे पतंजली हर्बल फूड पार्कमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारीनंतर झालेल्या गोळीबारात एका जणाचा मृत्यू झाल्या प्रकरणी अटक करण्यात आलेला योगगुरू रामदेव बाबा यांचा भाऊ रामभरत याला आज (गुरुवार) न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.
हरिद्वारच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्बल फूड पार्कमध्ये कॉन्ट्रॅक्टच्या वादातून सुरक्षा रक्षक आणि कामगारांमध्ये तुंबळ हाणामारी व गोळीबार झाला होता. या प्रकरणी आम्ही रामभरतला अटक केली होती. त्याने सुरक्षा रक्षकांना गोळीबार करण्याचे आदेश दिल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे. फूड पार्कमधून सहा रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच चार सुरक्षा रक्षकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
आज रामभरतला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयांनी त्याला न्यायालयीन कोठडी सुनाविली.