अनुपम खेर यांनी काढला ‘मार्च फॉर इंडिया’

अनुपम खेर यांनी काढला ‘मार्च फॉर इंडिया’

देशात सहिष्णुतेचे वातावरण कायम असल्याचे सांगत पुरस्कार परत करणाऱ्यांविरोधात अभिनेते अनुपम खेर यांनी आज (शनिवार) राष्ट्रीय संग्रहालयापासून राष्ट्रपती भवनापर्यंत ‘मार्च फॉर इंडिया‘ काढला.
 
देशात सध्या असहिष्णुतेचे वातावरण पसरल्याचे सांगत केंद्र सरकारच्या धारणांना विरोध करत अनेक साहित्यिकांकडून साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करण्यात येत आहेत. याबरोबरत शाहरुख खानसह अन्य काही मंडळींनी देशात असहिष्णुता वाढत असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षांकडूनही केंद्राला असहिष्णुतेच्या मुद्य्यावरून लक्ष्य करण्यात येत आहे. या विरोधात अनुपम खेर यांनी या मार्चचे आयोजन केले आहे. या मोर्चात दिग्दर्शक मधुर भांडारकरही सहभागी झाले होते.
 
अनुपम खेर यांनी आपण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटून देशात सहिष्णुता असल्याचे सांगणार असल्याचे सांगितले. अनुपम खेर म्हणाले, की भारताला असहिष्णु संबोधण्याचा अधिकार कोणाला नाही. प्रत्येक देशात काही ना काही अडचणी असतात, त्यामुळे देशाला असहिष्णु ठरविणे चुकीचे आहे. आपण सर्व धर्मनिरपेक्ष आहोत. पुरस्कार परत करणाऱ्यांना 1984 मध्ये झालेल्या शिखविरोधी दंगलीवेळी असहिष्णुता दिसली नव्हती का? आम्ही आज काढलेला मोर्चा हा भारतासाठी होता, कोणाविरुद्ध नव्हता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *