दक्षिण सुदानमध्ये बुधवारी एक मालवाहतूक विमान दुर्घटनाग्रस्त झाले. नाईल नदीच्या पूर्व किना-यावर हे विमान कोसळले.
या अपघातात ४१ नागरीकांचा मृत्यू झाला. दुर्घटनास्थळ विमानतळापासून जवळ आहे. उड्डाणानंतर काही मिनिटांच्या आतच हे विमान कोसळले. दक्षिण सुदानची राजधानी जुबा येथून या विमानाने उड्डाण केले होते.
नाईल नदीच्या पूर्व किना-यावर हे विमान कोसळले तो नागरीवस्तीचा भाग होता. घटनास्थळी विमानाचे भाग विखरुन पडले होते. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
हे विमान रशियन बनावटीचे होते. अप्पर नाईलमधील पालोच येथे हे विमान चालले होते. अप्पर नाईल भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी बंडखोर आणि सरकारी फौजांमध्ये लढाई सुरु आहे.