राज्यभरात निर्माण झालेले कोरडे वातावरण आणि पावसाचा अभाव या पार्श्वभूमीवर गुरुवार ८ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सूनने माघार घेतल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले. गुरुवारी मान्सून माघारीची रेषा गोव्यापर्यंत खाली सरकली.
गोव्याचा काही भाग, तसेच कर्नाटक, तेलंगण, झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागांतूनही मान्सूनने माघार घेतली. राज्यात मान्सून परतीसोबतच तापमानाचा पाराही वाढू लागला आहे.
