सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधी तिवारीच्या मृत्यू प्रकरणात तिच्या आईनेच केलेल्या धक्कादायक दाव्यामुळे यात अधिकाधिक गुंतागुत वाढली आहे. निधीच्या मृत्यूनंतर, तिची आई हेमलता तिवारी यांनी आपल्या मुलीच्या आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक दाव केले आहेत. त्यामुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. हेमलता तिवारी यांनी पोलिसांनी सांगितलं की, निधी कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी होती. महत्त्वाचे म्हणजे कुटुंबाची जबाबदारी सांभाळता सांभाळता तिने बैधानमध्ये एक आलिशान घर बांधत होती. पण याच काळात तिचं एका विवाहित आणि दोन मुलांच्या इंजिनिअर वडिलांशी संबंध होते.
हेमलता तिवारी यांनी पुढे पोलिसांना सांगितलं की, निधी मोरवा ही जीएस ग्रँड हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. या हॉटेलमध्ये एनसीएलच्या आउटसोर्सिंग व्यवसायात काम करणारा सोनू सिंग वरच्या वर स्टेसाठी येत होता. सोनू हा पंजाबचा होता आणि तो इंजिनिअर होता.
हे दोघे हॉटेलमध्ये काम करत असतानाच त्यांची भेट झाली आणि नंतर त्यांची मैत्री झाली. या दोघांच्या मैत्रीबद्दल माहिती होतं पण कुटुंबाला सोनू विवाहित असू त्याला दोन मुलं आहेत, हे नंतर समजलं. त्यानंतर कुटुंबाने निधीला त्याच्यापासून दूर राहण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते तरीही एकमेकांच्या संपर्कात होते.
निधीच्या आईने असा आरोप केला आहे की, सोनू हा आपल्या मुलीवर सतत पाळत ठेवत होता. निधी कायम ब्लूटूथ इअरफोन लावून सतत सोनूच्या संपर्कात राहायची. कारण निधी कुठे आहे, तिच्या आजूबाजूला कोण आहे, हे सोनूला जाणून घ्यायचं असायचं. तसंच ती सतत ऑनलाइनही असायची.
तिच्या आईच्या म्हणण्यानुसार, निधी सर्वात मोठी मुलगी होती आणि तिने कुटुंबाच्या
जबाबदाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. तिचे वडील, अशोक तिवारी, एका कंपनीत काम करत होते, पण नंतर बदली झाल्यामुळे ते कुटुंबापासून दूर गेले. हेमलता सांगतात की, त्यांनी एकट्यानेच मुलांचे संगोपन केले.
निधी बैधानमध्ये स्वतःसाठी एक आलिशान घर बांधत होती. तिच्या आईच्या म्हणण्यानुसार, ती आपल्या घराचे आणि कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सतत मेहनत करत होती, पण त्याचबरोबर तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोंधळामुळे तणावाखालीही होती.
घटनेच्या दिवशी काय घडले?
हेमलता तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या दिवशी निधीने खाली पूजा केली आणि नंतर ती वर तिच्या खोलीत गेली. तिने अजूनही ब्लूटूथ घातले होते. त्यानंतर, तिला सोनू सिंगचा फोन आला.
थोड्या वेळाने, जेव्हा कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला, तेव्हा आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, निधी खोलीतील पंख्याला तिच्या स्कार्फने लटकलेल्या अवस्थेत आढळली. निधीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने केलेल्या या दाव्यांमुळे सोनू सिंगसोबतचे तिचे नाते, निधीची मानसिक स्थिती आणि घटनेला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या दाव्यांची सत्यता आणि निधीच्या मृत्यूचे खरे कारण आता पोलीस तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांमधून उघड होईल.
