कनाथ शिंदेंच्या शिवसेना नेत्याने आत्महत्या केली असून, एकच खळबळ उडाली आहे. शिवाजीराव शिंदे यांनी राहत्या घरात टोकाचं पाऊल उचललं. ते पक्षाचे माजी तालुकाप्रमुख होते. बीडच्या दादाहरी वडगाव येथील रहिवासी आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात अनेकांना धक्का बसला आहे.
दरम्यान शिवाजीराव शिंदे यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे हे टोकाचे पाऊल उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून आत्महत्येचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
