मध्य, हार्बर मार्गावरील दुरुस्तीच्या कामांमुळे रविवारी मेगा ब्लॉक! कसं असणार वेळापत्रक?

मुंबईची लोकल ट्रेन ही येथील प्रवासाची लाईफलाईन आहे. दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी लोकल ट्रेनमधून प्रवास करत आपलं स्थान गाठतात. मात्र बऱ्याचदा दुरुस्तीच्या कामांमुळे शनिवार आणि रविवारी काही लोकल मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येतो. गणेशोत्सवानिमित्त गेल्या आठवड्यात मेगा ब्लॉक घेण्यात आलेला नव्हता. मात्र या आठवड्यात दुरुस्तीच्या कामांमुळे मध्य, हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाईल. मध्य रेल्वेने माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशी दरम्यान रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेने भाईंदर ते वसई रोडदरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घोषित केला आहे. यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर ब्लॉक असणार नाही.

स्थानक :  भाईंदर ते वसई रोड
मार्ग : अप आणि डाउन धीमा
वेळ : शनिवारी मध्यरात्री 12:30 ते रविवारी पहाटे 4: 30 पर्यंत
परिणाम : विरार/वसई रोड ते बोरिवली/ भाईंदरदरम्यान धावणाऱ्या अप, डाउन धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही फेऱ्या रद्द राहणार आहेत.

माटुंगा ते मुलुंड मध्य रेल्वे ब्लॉक : 

स्थानक : माटुंगा ते मुलुंड
मार्ग : अप आणि डाउन
वेळ : मेगा ब्लॉक वेळ सकाळी 11: 05 ते दुपारी  3: 45

हार्बर रेल्वे : 

स्थानक :  कुर्ला ते वाशी
मार्ग :  अप आणि डाउन
वेळ :  सकाळ 11: 10 ते दुपारी 4: 10
परिणाम : ब्लॉक वेळेत सीएसएमटी ते वाशी / बेलापूर/ पनवेलदरम्यान अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. ट्रॉन्स हार्बर आणि उरण पोर्ट मार्गावरील लोकल वेळापत्रकाप्रमाणे धावतील. हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या 15 ते 20 मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर उद्या रात्रीचा ब्लॉक : 

परिणाम – ब्लॉक वेळेत अप, डाउन धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द, विलंबाने धावतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *