दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालं आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा होत असते.

दहावीची लेखी परीक्षा कधी? 

तर बारावी पाठोपाठ दहावीची लेखी परीक्षा ही 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून ती 11 मार्चपर्यंत चालणार आहे.  आनंदाची बातमी दहावी आणि बारावीची परीक्षाही होळीच्या पूर्वी संपणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना होळीचा आनंद घेता येणार आहे.

प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा जाणून घ्या!

लेखी परीक्षांपूर्वी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा होणार आहेत. विद्यार्थ्यांना लक्षात घ्या नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यात बुधवार, 20 जानेवारी ते शनिवार, 6 फेब्रुवारी 2027 या दरम्यान तुमची प्रात्यक्षिक होणार आहेत. तर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा ही नवीन वर्षांच्या पहिला महिन्यातील शेवटच्या आठवड्यात, २८ जानेवारी ते शनिवार, १३ फेब्रुवारी २०२७ या दरम्यान होणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलं जात आहे. पण यंदा मात्र एक महिना उशिराने म्हणजे सप्टेंबर महिना संपणार तेव्हा जाऊन दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलं गेलं आहे. तर दहावी आणि बारीवीच्या परीक्षांचा ऑनलाईन निकाल मे अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येईल अशा अंदाजही त्यांनी वर्तविला आहे. त्यानंतर अनुत्तीर्ण तसंच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणत जुलैच्या तिसर्‍या आठवडयापासून घेतली जाणार आहे, असं सांगण्यात आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *