संजीव सोनवणे प्रकरण; घराचं गेट उघडताच भावाला आवाज, बहिणीमुळे घटनेचा उलगडा, संपूर्ण कुटुंब विदेशात; नैराश्य असल्याचीही चर्चा

डॉ. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक संजीव चंद्रभानू सोनवणे (वय 65) यांनी शहरातील पद्मानगर येथील स्वतःच्या घरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना काल मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

सोनवणे बेडवर रक्ताच्या थारोळ्यात

संजीव सोनवणे शहरातील पद्मानगर परिसरातील त्यांच्या मोठ्या बंगल्यात एकटेच राहत होते. त्यांची पत्नी सुचेता, मुलगा दिग्विजय, मुलगी क्षमा आणि जावई हे सर्व अमेरिकेत वास्तव्यास आहेत. 14 सप्टेंबर सोमवारी रोजी रात्री ते घरी एकटेच होते. दुसऱ्या दिवशी बहीण त्यांना भेटायला आली असता घराचे गेट उघडल्यानंतर बहिणीने त्यांना आवाज दिला. प्रतिसाद न मिळाल्यानं त्या दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या बेडरूममध्ये गेल्या. तेथे सोनवणे बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. घटनास्थळी त्यांचे परवानाधारक शस्त्र आणि सुसाईड नोटही सापडली. त्यानंतर या धक्कादायक घटनेची माहिती अमेरिकेतील त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *