सोन्याच्या हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67 टक्क्यांची वाढ, ग्राहकांना किती किंमत मोजावी लागणार? वाचा

भारतीय मानक ब्युरो म्हणजे BIS ने हॉलमार्किग संबंधित एक नवीन अधिसूचना जारी केली आहे. याचा थेट असर सोन्याच्या मजुरीवर पडणार आहे. सोन्याच्या हॉलमार्किंग शुल्कात वाढ होणार आहे. पण चांदीच्या हॉलमार्किंगचे दर कायम राहणार आहेत.

BIS ने 14 सप्टेंबर 2026 रोजी एक अधिसूचना जारी केली होकी. या अधिसूचनेनुसार भारतीय मानक ब्युरो अधिनियम, 2016 च्या कलम 39, कलम 13 आणि 14 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही नवीन अनुसूची आता हॉलमार्किंग शुल्क निश्चित करणार आहे.

सोन्याच्या हॉलमार्किंगच्या शुल्कावर थेट परिणाम होणार आहे. पूर्वी सराफांना मान्यताप्राप्त असेइंग आणि हॉलमार्किंग केंद्राला प्रत्येक सोन्याच्या वस्तूमागे ₹45 द्यावे लागत होते. आता, हे शुल्क वाढून प्रत्येक वस्तूमागे ₹75 झाले आहे. ही प्रत्येक वस्तूमागे ₹30 ची थेट वाढ असून, ही अंदाजे 66.7 टक्क्यांची मोठी वाढ आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे, एका खेपसाठीचे किमान शुल्क ₹200 कायम राहिले आहे. हे नवीन दर 14 सप्टेंबर 2026 पासून लागू होतील.

अंदमान आणि हिमाचल प्रदेश केंद्रांकडून BIS द्वारे सोन्यासाठी आकारले जाणारे शुल्क देखील प्रति नग ₹4.50 वरून ₹7.50 पर्यंत वाढले आहे. BIS नुसार, हे शुल्क वजनानुसार नव्हे, तर प्रति नग आकारले जातील.

चांदीचे शुल्क कायम

चांदीचे शुल्क प्रति नग ₹35 वर कायम आहे. ज्यांना आपल्या चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्क हवा आहे, त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सराफांना चांदीच्या वस्तूंसाठी तपासणी आणि हॉलमार्किंग केंद्राला द्यावे लागणारे शुल्क प्रति नग ₹35 इतकेच ठेवण्यात आले आहे. त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. नवीन वेळापत्रकानुसार, चांदीच्या वस्तूंच्या कंसाइनमेंटसाठी किमान शुल्क ₹150 निश्चित करण्यात आले आहे.

BIS आणि केंद्र यांच्यातील शुल्कातही बदल

आणखी एक महत्त्वाचा बदल थेट सराफांशी संबंधित नसून, केंद्र आणि BIS यांच्यातील व्यवहाराशी संबंधित आहे. BIS पूर्वी तपासणी आणि हॉलमार्किंग केंद्राकडून सोन्याच्या वस्तूंसाठी जे शुल्क आकारत असे, जे पूर्वी प्रति नग ₹4.50 होते, ते आता प्रति नग ₹7.50 पर्यंत वाढवण्यात आले आहे. कंसाइनमेंटसाठी किमान शुल्क देखील ₹20 ठेवण्यात आले आहे. चांदीच्या वस्तूंसाठी, BIS केंद्राकडून प्रति नग ₹3.50 आकारेल, ज्यामध्ये किमान कंसाइनमेंट शुल्क ₹15 असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *