खोपोलीजवळील ट्रक-कंटेनर अपघातात चालकाचा मृत्यू

खोपोलीजवळील ट्रक-कंटेनर अपघातात चालकाचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली फुडमॉलजवळ सिमेंट ट्रक आणि कंटेनर यांच्यात मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सिमेंटच्या ट्रकला मागून आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिली. यामुळे ट्रकमधील सिमेंटच्या गोण्या रस्त्यावर पडल्या. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

पुण्याहून मुंबईकडे येणा-या चार रांगांपैकी तीन रांगा बंद करण्यात आल्या आहेत. एकाच रांगेतून वाहतूक संथ गतीने सुरु आहे. यामुळे  मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *