31 ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. मागच्या काही काळात कच्च्या तेलाच्या किंमतीत लागोपाठ चढ उतार पाहायला मिळत असून भू-राजनीतिक तणाव काळात सरकारी कंपन्यांद्वारे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलाय ज्यामुळे ग्राहकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
तुमच्या शहरातील पेट्रोलच्या किंमती (प्रति लिटर) :
दिल्ली: 102.12 रुपये
मुंबई: 111.31 रुपये
कोलकाता: 113.51 रुपये
चेन्नई : 107.78 रुपये
हैदराबाद: 115.69 रुपये
पटना: 113.35 रुपये
वाराणसी: 107.40 रुपये
भुवनेश्वर: 103.19 रुपये
आगरा: 107.09 रुपये
तुमच्या शहरातील डिझेलची किंमती (प्रति लिटर) :
दिल्ली : 95.20 रुपये
मुंबई : 97.97 रुपये
कोलकाता : 99.82 रुपये
चेन्नई : 99.56 रुपये
हैदराबाद : 103.82 रुपये
पटना : 99.36 रुपये
वाराणसी : 90.10 रुपये
भुवनेश्वर : 100.68 रुपये
आगरा : 89.80 रुपये
कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ :
सोमवारी अमेरिकेच्या सैन्याने ईराणच्या सैन्य तळांवर हल्ला केला ही बातमी मिळताच आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडच्या किमती पुन्हा एकदा प्रति बॅरल 90 डॉलर्सच्या वर गेल्या. याच काळात अमेरिकन क्रूडच्या किंमतीतही मोठी वाढ झाली. आंतरराष्ट्रीय मानक म्हणून मानलं जाणारं ब्रेंट क्रूडची किंमत ही 2.52% ने वाढून 90.32 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे, अमेरिकेचे ‘वेस्ट टेक्सास इंटरमीजिएट’ (WTI) कच्चे तेल 2.41 टक्क्यांच्या वाढीसह प्रति बॅरल 85.41 डॉलर्सवर व्यवहार करत आहे.
