DMart मधून शॉपिंग करणाऱ्यांना बंपर फायदा! मालक राधाकिशन दमाणी करणार 500 कोटींची गुंतवणूक

DMart मधून शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना भविष्यात बंपर फायदा होणार आहे. DMart चे मालक ज्येष्ठ उद्योगपती आणि गुंतवणूकदार राधाकिशन दमाणी यांनी त्यांच्या रिटेल व्यवसायात 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.  ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स या कंपनीत ही गुंतवणूक करण्यात आली आहे. यामुळे ऑनलाईन खरदे करणाऱ्या DMart ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.

ॲव्हेन्यू सुपरमार्ट्सने ही सुपरमार्केट चेन डीमार्टची मूळ कंपनी आहे. ऑनलाइन किराणा उपकंपनी ॲव्हेन्यू ई-कॉमर्समध्ये 500 कोटी रुपयांपर्यंतच्या नवीन गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. वाढता तोटा असूनही कंपनीने डीमार्ट रेडीमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) मंजूर झालेल्या या गुंतवणुकीमुळे, AEL मधील एकूण गुंतवणूक अंदाजे 2,000 कोटींपर्यंत पोहोचू शकते, ज्यामध्ये आर्थिक वर्ष 2026 दरम्यान केलेल्या 350 कोटींच्या गुंतवणुकीचा देखील समावेश आहे, असे कंपनीने गुरुवारी एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *