पुण्यात रक्षकच बनला भक्षक! मुलगा होत नाही म्हणून पुण्यात PSI पतीची पत्नीला मारहाण, शेतात नेऊन जबरदस्ती गर्भपात

खाकी वर्दीचा धाक गुन्हेगारांवर असावा लागतो, पण इथे खुद्द कायद्याचा रक्षकच घरातल्या लक्ष्मीसाठी यमदूत बनल्याचा संतापजनक प्रकार पुण्यात समोर आला आहे. ‘तुला मुलगाच जन्माला घालता येत नाही,’ असा विकृत संताप करून पुण्यातील मांजरीतील एका पोलीस उपनिरीक्षकाने स्वतःच्या पत्नीचा गळा आवळून तिला संपवण्याचाच प्रयत्न केला आहे.

आई-मुलावर गर्भपाताचा गुन्हा

इतकेच नाही, तर पोटातील बाळ मुलगी असल्याचं कळताच तिची जबरदस्तीने गर्भलिंग तपासणी करून पोटातील अंकुर मारून टाकल्याचा संतापजनक प्रकार आता समोर आला आहे. ​हडपसरमधील शेवाळेवाडी येथे पी. एस. व्हिलामध्ये राहणारे पोलीस उपनिरीक्षक धनाजी रंगराव टोणे आणि त्यांची आई अनुसया रंगराव टोणे यांच्यावर आता हत्येचा प्रयत्न आणि बेकायदेशीर गर्भपाताचा गंभीर गुन्हा नोंदवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *