भरधाव ॲस्टन मार्टिनची धडक, Inorbit मॉलबाहेर 26 वर्षीय तरुणीचा दुःखद अंत, राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा

भरधाव वेगाने जाणाऱ्या ‘ॲस्टन मार्टिन’ कारने दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. हैदराबादमधील इनऑर्बिट मॉलबाहेर ही दुर्दैवी घटना घडली. ही कार आंध्र प्रदेशातील एका राज्यसभा खासदाराचा २३ वर्षीय मुलगा चालवत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप अटक करण्यात आलेली आहे.

भारती मुखी असे २६ वर्षीय मयत महिलेचे नाव आहे. ती हैदराबादच्या माधापूर भागातील इनऑर्बिट मॉलमध्ये एका लाईफस्टाईल स्टोअरमध्ये सेल्सवुमन म्हणून काम करत होती.

जेवून परत कामावर जाताना अपघात

एफआयआरमधील माहितीनुसार, भारती आणि तिची सहकारी पूजा अशोक अलोने (२६) गेल्या रविवारी १६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास दुपारचे जेवण करण्यासाठी जवळच असलेल्या आयटीसी कोहिनूर परिसराकडे गेल्या होत्या. जेवण करुन कामावर परत जाताना, रस्ता ओलांडत असताना या आलिशान कारने तिला जोरदार धडक दिली होती.

अपघातात भारतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. तिला त्याच कारमधून तातडीने ज्युबिली हिल्स परिसरातील अपोलो रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *