ती’ भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू

मुंबईच्या घाटकोपरमधील अशोक नगर येथील गौसिया चाळ परिसरात डोंगराचा भाग कोसळल्याची (Ghatkoper Ashok Nagar Landslide) दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर अद्याप युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु असून यात मृतांचा आकडा वाढला आहेमिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहेपहाटे साडे तीन ते चारच्या सुमारास ही दुदैवी घटना (Landslide) घडली होतीयात दोन ते तीन घरांवर दरड कोसळली असून यामध्ये अनेक जण अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. अशातच सहा ते सात तासांच्या अथक परिश्रमानंतर सात जणांचे मृतदेह हाती लागले असूनअजूनही काही जण या ढिगाऱ्याखाली अडकून असल्याची माहिती आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. यासाठी पहाटेपासून बचावकार्य सुरु असताना यात अल्ट्रा सेन्सर मशीनने मलब्या खाली अडकलेल्यांना शोधले जात आहे. तर ड्रोनची देखील मदत यात घेण्यात आली आहे.

दरम्यान, साकीनाका येथील दुर्घटनेत मृतांचा कुटुंबातील लोकांना पालिकेकडून 3 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर दुर्घटना घडलेल्या ठिकाणी रहात असलेल्या लोकांचे सुरक्षितस्थळी पुर्नवसन केलं जाईल. अशी देखील माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहेतर या पूर्वीच तिथे राहणाऱ्या लोकांना तो परिसर धोकादायक असल्याने नोटीसा बजावल्या होत्या. असे देखील सांगण्यात आलं आहेतर यावर बोलताना महापौर रितू तावडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की,

‘साकीनाका येथील घटना अंत्यत दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना आपण 3 लाखांची मदत जाहिर केलेली आहे. मात्र अंत्यत चिंचोळ्या गल्या आहेत. घटनास्थळी मशीन पोहचू शकत नसल्याने मनुष्यबळाचा वापर करूनच मदत करावी लागणार आहे. अजून काही लोकं अडकली असून मदतकार्य आणखी काही तास सुरू राहिल. या धोकादायक ठिकाणी घरांची नोटीसा देण्यात आल्या होत्या. मात्र लोकं त्यांचं पालन करत नाहीत. असे त्या म्हणाल्या.

नेमकं काय घडलं? 

घाटकोपर आणि साकीनाक्याच्या मध्यावर असलेल्या अशोक नगरमध्ये एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. यात अशोक नगरच्या गौसिया चाळ येथे डोंगर कोसळला आहे. प्राथमिक माहितीनुसार, यात पाच ते सहा जण अडकले आहे. आज (12 ऑगस्ट) पहाटे तीन ते चारच्या सुमारास हि घटना घडल्याची माहिती आहे. या भूस्खलनात डोंगराचा मोठा भाग दोन ते तीन घरांवर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि घाटकोपर पोलीस दाखल झाले आहेत. सध्या संबंधित विभागाकडून बचावकार्य सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *