भिवंडीच्या भंडारी कंपाउडमधील गंगाराम वाडी इथल्या कोहिनूर अपार्टमेंटची बी विंग कोसळलून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असून 3 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तसंच, बचाव कार्य अद्याप सुरू असून ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जातं आहे. NDRF आणि TDRF च्या पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. इमारत कोसळल्यानंतर अनेक सवाल उपस्थित होत आहेत. इमारत अधिकृत होती की अनाधिकृत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
भिवंडीतल्या कोहिनूर अपार्टमेंटमधील दुर्घटनाग्रस्त इमारतीबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. इमारत अधिकृत होती का? यावर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे उपआयुक्त विनोद शिंगटे यांनी म्हटलं आहे की, ही इमारत 12 वर्षांपूर्वी बेकायदेशीरपणे बांधली गेली होती. महापालिकेने रहिवाशांना इमारत रिकामी करण्याच्या नोटिसाही दिल्या होत्या. तर, रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, रहिवाशांनी सांगितले की इमारत 36 वर्षे जुनी आहे आणि 5 वर्षांपूर्वी प्लास्टर निघणे, भेगा पडणे यामुळे दुरुस्ती केली होती.
तसंच, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून साधारण 2014 च्या आसपास अनधिकृतपणे बांधण्यात आली होती. महापालिकेच्या रेकॉर्डनुसार ती बेकायदेशीर असल्याने अधिकृत बांधकाम वर्षाचा रेकॉर्ड उपलब्ध नाही.BNCMC ने महाड बिल्डिंग हादस्यानंतर ऑगस्टमध्ये भिवंडीतल्या सर्व धोकादायक इमारतींचा आढावा घेतला होता. त्यावेळी 25 अत्यंत धोकादायक इमारती ओळखल्या होत्या ज्यापैकी 8 पाडल्या.कोहिनूर अपार्टमेंटला फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये 2 वेळा नोटिस दिल्याचे महापालिकेने सांगितले.
नागरिकांचा दावा काय?
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेला दावा नागरिकांना नाकारला आहे. रहिवाशांनी सांगितले की इमारत 36 वर्षे जुनी आहे आणि 5 वर्षांपूर्वी प्लास्टर निघणे, भेगा पडणे यामुळे दुरुस्ती केली होती. तसंच, इमारत 36 वर्षे जुनी आहे. म्हणजे साधारण 1990 च्या आसपासची आहे.
महापालिकेची भूमिका काय?
भिवंडीत धोकादायक/अनधिकृत इमारतींची संख्या मोठी आहे. कोहिनूर अपार्टमेंट ही त्यापैकी एक होती असं समोर आले आहे. BNCMC ने तपासासाठी उपआयुक्त आणि सहाय्यक नगररचनाकार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. कोहिनूर अपार्टमेंटच्या B विंगच्या बाबतीत BNCMC कडून अजून सविस्तर चौकशी अहवाल येणे बाकी आहे.
