राज्यातील बळीराजाला सुखाचे दिवस यावेत
सोलापूर : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेची आषाढी एकादशीची शासकीय महापूजा पंढरपुरात पार पडली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पहाटे अडीच वाजता ही महापूजा भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडली. विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन मुख्यमंत्र्यांनी ‘राज्यातील बळीराजाला सुखाचे दिवस यावेत, चांगला पाऊस व्हावा आणि संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् व्हावा’, अशी प्रार्थना केली.
माने दाम्पत्य भावूक
या शासकीय महापूजेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही रांगेतील एका निष्ठावंत वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा बहुमान मिळाला. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगावचे शेतकरी श्री. बाळासाहेब माधव माने आणि त्यांच्या पत्नी सौ. प्रभावती बाळासाहेब माने या वारकरी दाम्पत्याला यंदाचे ‘मानाचे वारकरी’ म्हणून पूजा करण्याचा सन्मान लाभला. विठुरायाची पूजा करण्याची संधी मिळाल्याने माने दाम्पत्याला अत्यंत भावूक होऊन आनंद व्यक्त केला.
महापूजा भक्तीभावाने व उत्साहाने संपन्न
‘विठ्ठला राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सुखी ठेव. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे’, असे साकडे आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल रुक्मिणी चरणी घातले. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणीची आषाढी एकादशीची शासकीय महापूजा आज (ता.25) पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते भक्तीभावाने व उत्साहाने संपन्न झाली.
म्पत्य धाराशिव जिल्ह्यातील
यावेळी मानाचा वारकरी म्हणून उपस्थित राहण्याचा मान बाळासाहेब माधव माने व त्यांच्या पत्नी प्रभावती बाळासाहेब माने ( रा.गौरगांव ता.कळंब जि. धाराशिव) या शेतकरी दाम्पत्याला मिळाला. बाळासाहेब माने ( वय 70) हे शेतकरी असून ते गेल्या 20 वर्षा पासून आळंदी पंढरपूर पायी वारी करतात. यंदा ते आपल्या पत्नीसोबत वारीला आले आहेत. मध्यरात्री 12 वाजता दर्शन रांग बंद करण्यात आली तेव्हा रांगेत प्रथम असलेल्या बाळासाहेब माने यांची निवड समितीने मानाचा वारकरी म्हणून निवड केली.
